आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलीवूडच्या मदतीविना ‘क्रिएचर’ उभारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपाशाची प्रमुख भूमिका असणार्‍या या सिनेमाचे दिग्दर्शन विक्रम भट्टने केले आहे.

विक्रम भट्टने आपल्या आवडीच्या जॉनर हॉररमध्ये अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. हा सिनेमा ‘डर’पेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे सांगितले जात आहे. ‘क्रिएचर’संबंधी विक्रमने सांगितले की, ‘आतापर्यंत हॉलीवूडमध्ये क्रिएचर आनुवंशिक विभाजनामुळे अथवा वैज्ञानिक कारणांमुळे बनत होते. सिनेमातील 500 वर्षे जुने पात्र भारतीय पौराणिक कथेमधून आले आहे. हे पात्र बनवण्यासाठी आम्ही हॉलीवूडची मदत घेतली नाही. क्रिएचर आमच्याच प्रयोगशाळेत बनला असल्याचा संपूर्ण टीमला अभिमान आहे.’

सिनेमातील व्हिजुअल इफेक्ट्स चेन्नईच्या प्रसाद लॅबमध्ये बनवण्यात आले. थ्री-डी तंत्रज्ञान अशा प्रकारच्या सिनेमात योग्य असल्याचे विक्रम भट्ट मानतात. थ्री डी मध्ये त्यांनी इतके काम केले आहे की त्यांना आता टू-डीमध्ये अनेक उणिवा दिसून येतात.