(अभिनेत्री परिणीती चोप्र आणि अभिनेता आदित्य राय कपूर)
मुंबई: आदित्य चोप्रा आणि
परिणीती चोप्रा सध्या त्यांच्या 'दावत-ए-इश्क' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा सिनेमा या महिन्याच्या 19 तारखेला रिलीज होत आहे. दोघे सिनेमा हिट करण्याच्या विचाराने प्रमोशन करत आहे.
सिनेमा प्रमोशनसाठी आदित्य-परिणीती फूड यात्रा करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी दोघे जेवण करताना दिसत आहेत. दोघांनी प्रमोशनसाठी मुंबई चंदीगडपर्यंत यात्रा करण्याचा प्लॅन केला आहे. शुक्रवारी दोघे बाइकवर सवार होऊन मद्रास कॅफेमध्ये पोहोचले होते. येथे त्यांनी साउथ इंडियन जेवणाचा आनंद घेतला. दोघे कॅफेमधून बाहेर आल्यानंतर चाहत्यांनी त्यांना घेरले.
यावेळी परिणीती निळी जीन्स आणि ब्लॅक टी-शर्ट गेटअपमध्ये दिसली. तसेच, आदित्य निळी जीन्स आणि शर्ट लूकमध्ये दिसला,
'दावत-ए-इश्क'चे दिग्दर्शन हबीब फैजलने केले असून आदित्य चोप्राने निर्मित केला आहे. हा सिनेमा यशराज बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. सिनेमात अनुपम खेर, करण वाहीसुध्दा दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रमोशनसाठी फूड यात्रावर निघालेले आदित्य-परिणीतीचे Pics...