आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICSमध्ये बघा \'रिव्हॉल्वर राणी\' कंगनाचा दबंग अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची 'क्वीन' अर्थातच कंगना राणावत आपल्या आगामी सिनेमामध्ये पुन्हा एकदा राणी बनणार आहे. या नवीन सिनेमाचे नाव 'रिव्हॉल्वर राणी' असून हा पुढील आठवड्यात (25 एप्रिल) रिलीज होणार आहे. सिनेमाचे शिर्षकानुसारच कंगना या सिनेमात एक फॅशनेबल दबंग गर्लच्या रुपात दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि दोन व्हिडिओ गाणी लाँच झाली आहेत. 'रिव्हॉल्वर राणी'च्या 'ठांय ठांय ठांय...' आणि 'ठांय करे कट्टा यहा धक्का देनी से...' गी दोन गाणी सध्या यू-ट्यूबर धूम घालत आहेत. ट्रेलरमध्ये कंगनाचा बिनधास्त अंदाजाला चांगलेच पसंत केले जात आहे.
सिनेमात कंगनाची भूमिका
'रिव्हॉल्वर राणी' हा एक कॉमेडी-ड्रामा असून ती या एका दबंग लेडीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती फॅशनसोबत गन आणि फन दोन्ही पसंत करते. सिनेमात तिच्या पात्राचे नाव अल्का सिंह आहे. 'रिव्हॉल्वर राणी'मध्ये कंगना राजकारणात सक्रिय भूमिका वठवताना दिसणार आहे. 'हम है अल्का सिंह...आय लव्ह फॅशन, फन और गन' या तिच्या डायलॉगलासुध्दा लोकांनी पसंत केले आहे. याव्यतिरिक्त 'हमारे कपडे इटली से आते है' या डायलॉगवरून स्पष्ट होते, की ती या सिनेमात खूपच फॅशनेबल दिसणार आहे.
सिनेमात इतर कलाकार
दिग्दर्शक साई कबीरच्या या सिनेमात कंगना व्यतिरिक्त पियूष मिश्रा आणि वीर दास यांच्यासुध्दा मुख्य भूमिका आहेत. 'रिव्हॉल्वर राणी'ला राजू चड्डा आणि राहून मिश्राने मिळून निर्मित केले आहे. सिनेमात पुनित शर्मा आणि संजीव श्रीवास्तवने संगीत दिले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'रिव्हॉल्वर राणी'मध्ये कंगनाचा काही खास अंदाज...