आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FASHION TREND: बॉलिवूड अभिनेत्रींची पहिली पसंत साडी गाऊन लूक, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलपैकी एक कान्समध्ये यंदा सोनम कपूर ग्लॅमरस जलवा दाखवताना दिसली. समारंभात पहिल्या दिवशी सोनम स्टाइलिश साडी गाऊनमध्ये दिसली. फिक्या पीच रंगाच्या या आउटफिटमध्ये सोनम खूपच आकर्षक दिसली.
तसे पाहता, सोनमला इंडस्ट्रीमध्ये स्टाइलिश आयकॉन मानले जाते. तिची फॅशन नेहमी सर्वात आकर्षक असते. आपल्या सिनेमांपेक्षा ती आपल्या ड्रेस आणि लूकमुळे सर्वाधिक चर्चेत असते. अनेक तरुणींसाठी ती फॅशन गुरू आहे. लाखो तरुणी तिला फॅशनसाठी फॉलो करतात.

कान्स 2014मध्ये सोनमच्या फस्ट लूकची खूप प्रशंसा करण्यात आली. साडी गाऊनच्या लूकमध्ये स्टाइलसह ती भारतीय वेशभूषेत दिसली. परंतु सध्या साडी गाऊनची लूक सर्वात जास्त ट्रेन्डमध्ये आहे. अनेक निमित्तांवर अभिनेत्री या आउटफिटमध्ये दिसतात. त्यामध्ये सोनमपासून मलायका अरोरा खान, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफपर्यंत अभिनेत्री यात सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा साडी गाऊनमध्ये अभिनेत्रींची ग्लॅमरस छायाचित्रे...