आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dad Hrithik Enjoys Screening Of 'X Men' With Kids

हृतिक मुलांसह पोहोचला 'X-Men'च्या स्क्रिनिंगला, दिसले अनेक स्टार्स, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक ब्रायन सिंगरच्या 'एक्स-मॅन: डेज ऑफ फ्युचर पास्ट' हा हॉलिवूड सिनेमा जरी रुपेरी पडद्यावर झळकला असला तरी त्याच्या स्क्रिनिंगचा सिलसिला चालूच आहे. शुक्रवारी (22 मे) मुंबईमध्ये लाइटबॉक्सवर सिनेमाची स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हृतिक रोशनसह अनेक स्टार्स सामील झाले होते.
स्क्रिनिंगमंध्ये हृतिक रोशन आपल्या रिदान आणि रिहान या दोन मुलांसह पोहोचला होता. यावेळी रिदान पापाच्या कुशीत झोपलेला होता. मुलांसोबत हृतिक खूप आनंदी दिसत होता. तो आपल्या मुलांसोबत दिर्घकाळानंतर माध्यमांसमोर आला. कारण काही दिवसांपूर्वी तो 'बँग बँग'च्या शुटिंग करून अबू धावीहून परतला होता. स्क्रिनिंगमध्ये सोनाली बेंद्रे पति होल्डी बहलसह पोहोचली होती. यादरम्यान मुलगा रणवीरसुध्दा तिच्यासह दिसला. यांच्यासह, गायत्री जोशी, शाहिद कपूर, दिपक तिजोरीसुध्दा स्क्रिनिंगला उपस्थित होते.
'एक्स-मॅन: डेज ऑफ फ्यूचर पास्टच्या पहिल्या स्क्रिनिंगमध्ये कतरिना कैफ, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, अर्जुन कपूर सामील झाले होते. तसेच, दुस-या स्क्रिनिंगला सुझान रोशन, अर्जुन रामपाल, मेहर, जॅकलीन फर्नांडिस, डीनो मोरियो, साकिब सलीम, पार्थो गुप्ते, प्रतीक बब्बरसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'X-Men'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...