आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिष्‍माच्‍या 'डेंजरस इश्‍क'चा फर्स्‍ट लूक झाला प्रदर्शित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वर्षांनंतर बॉलिवूडमध्‍ये पुनरागमन करणा-या करिष्‍मा कपूरच्‍या बहुचर्चित 'डेंजरस इश्‍क' या चित्रपटाचा फर्स्‍ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात करिष्‍मा कपूरला राजस्‍थानी ग्रामीण तरूणीचा लूक दिलेला आहे.
चॉकलेटी रंगाची घागरा-चोळी आणि लाल रंगाची ओढणी परिधान केलेली करिष्‍मा खूप सुंदर दिसत आहे. तिने घातलेले दागिने राजस्‍थानी पद्धतीचे आहेत. या जुन्‍या व पारंपरिक दागिन्‍यांमुळेच तिच्‍या सौंदर्यात भर पडली आहे.
या चित्रपटाची निर्मिती बीव्‍हीजी फिल्‍म्‍स, दार मोशन पिक्‍चर्स आणि रिलायन्‍स एन्‍टरटेन्‍मेंट यांची असून चित्रपटाचे दिग्‍दर्शन विक्रम भट यांनी केले आहे. चित्रपटात जिमी शेरगिल, रजनीश दुग्‍गल, दिव्‍या दत्‍ता, रवी किशन आणि रुस्‍लान मुमताज यांनी भूमिका साकारल्‍या आहेत. चित्रपटाला हिमेश रेशमियाचे संगीत लाभले आहे.
चित्रपटातून इतिहासजमा झालेल्‍या पाच पर्वांमधील भारतीय स्‍त्रीचे दर्शन घडणार आहे. 3डी इफेक्‍टने सजलेला हा चित्रपट 11 मे,2012 ला प्रदर्शित होण्‍याची शक्‍यता आहे.