आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Danny Denzongpa's Daughter In Funeral Of Madan Mohan

स्मशान घाटावर कुटुंबासोबत पोहोचली डॅनी डेन्जोंगपांची मुलगी, फोटोग्राफर्सना दिसली टाळताना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डॅनी डेन्जोंगपा यांची मुलगी पेमा)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता डॅनी डेन्जोंगपा यांचे मॅनेजर मदन मोहन यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. मदन मोहन यांना अखेरचा निरोप द्यायला संपूर्ण डेंन्जोंगपा कुटुंब उपस्थित होते. यावेळी डॅनी यांच्या पत्नी गवा आणि मुलगी पेमा एका कारमधून स्मशान घाटावर पोहोचल्या. तर डॅनी आणि त्यांचा मुलगा रिज्लिंग दुस-या कारने तेथे आले.
नेहमी लाइमलाइटपासून दूर राहणारी डॅनी यांची मुलगी पेमा येथे फोटोग्राफर्सना टाळण्याचा प्रयत्न करताना दिसली. काही फोटोग्राफर्स तिची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पेमाने तिचा चेहरा कॅमे-यात कैद होणार नाही, याकडे लक्ष दिले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा डॅनी यांच्या मुलीसोबत मुलगा आणि पत्नीची छायाचित्रे...