आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्यांनी बालपणीच करुन दिले लग्न, वयाच्या १७ व्या वर्षी बनले वडील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारा सिंग रंधावा यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२८ रोजी पंजाबच्या धरमूचक गावात झाला होता. दारा सिंग यांच्या आईचे नाव बलवन्त कौर आणि वडिलांचे नाव सूरत सिंग रंधावा होते. दारा सिंग यांच्या फिल्मी करिअरविषयी आपल्याला बरेच काही ठाऊक आहे, मात्र त्यांच्या खाजगी आयुष्याबदद्ल फार थोड्या जणांना ठाऊक आहे.
दारा सिगं यांचे बालपणीच लग्न झाले होते. वयाच्या केवळ १७व्या वर्षी ते एका मुलाचे वडील झाले होते. दारा सिंग यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मनाविरुद्ध त्यांचे लग्न लावून टाकले होते. त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तरुणीशी दारा सिंग यांचे लग्न झाले होते. त्यांना वयाच्या १७ व्या वर्षी मुलगा झाला होता. त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव प्रद्युम्न सिंग आहे. कुस्तीगीर म्हणून प्रसिद्ध झाल्यानंतर दारा सिंग यांनी आपल्या पसंतीने सुरजीत कौर यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत.
जीवन आणि मृत्युशी अनेक दिवस संघर्ष केल्यानंतर दारा सिंग यांनी गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ७ जुलैपासून ते रुग्णालयात दाखल होते. मात्र बुधवारी त्यांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना बुधवारी रात्री घरी हलविण्यात आले होते. अखेरीस आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.
PHOTOS : दारा सिंग यांचा जीवनप्रवास
VIDEO - दारा सिंग यांचे आठवणीतील काही क्षण
ज्येष्ठ अभिनेते, रुस्तम-ए-हिंद दारा सिंग यांचे निधन
दारा सिंह यांना ब्रेन हॅमरेज ; विकिपीडियाने ठरवले मृत, ट्विटरवर श्रद्धांजली