आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारा सिंग कृत्रिम श्वासोच्छवासावर, प्रकृती गंभीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते आणि नामवंत पैलवान दारा सिंग यांची प्रकृती खूपच गंभीर आहे. पुढचे ३६ तास त्यांच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दारा सिंग यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ निर्माण झाली आहे. शिवाय त्यांच्या रक्तातला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. सध्या दारा सिंग यांना डायलिसिस सुरु केले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दारा सिंग यांची तब्येत नाजूक असल्यामुळे अद्याप त्यांचे सिटी स्कॅन करण्यात आलेले नाही. त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दारा सिंग ८३ वर्षांचे असून एक नामांकित पैलवान आहेत. तसंच अभिनेते म्हणूनही त्यांचं नाव आहे. रामानंद सागर यांच्या रामाणमध्ये त्यांनी केलेली हनुमानाची भूमिका विशेष गाजली होती. २००७ साली प्रदर्शित झालेल्या 'जब वी मेट' या सिनेमातही ते होते.
दारा सिंग यांना हृदयविकाराचा झटका, रुग्‍णालयात दाखल