(सिल्क स्मिता)
फिल्मी दुनियेतील सर्वात वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सिल्क स्मिताची 23 सप्टेंबर रोजी 18वी पुण्यतिथी होती. 23 सप्टेंबर 1996 रोजी राहत्या घरी सिल्क रहस्यमयरित्या मृतावस्थेत आढळली होती. सिल्क स्मिता दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री होती.
आपल्या बोल्ड भूमिकांमुळे तिला सॉफ्ट पोर्न अभिनेत्रीही म्हटले जात होते.
मनाविरुद्ध करावे लागले होते लग्न...
सिल्कचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी आंध्र प्रदेशातील एल्लुरुमधील एका गरीब कुटुंबात झाला होता. तिचे खरे नाव विजयालक्ष्मी होते. कुटुंबीय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्यामुळे तिचे शिक्षण केवळ चौथीपर्यंतच होऊ शकले. बालपणापासूनच सिनेमांची आवड असल्यामुळे अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र कमी वयातच तिच्या मनाविरुद्ध तिचे लग्न करुन देण्यात आले. मात्र जबरदस्तीने केलेल्या लग्नात ती खुश नव्हती. सासरच्या छळाला कटांळून एकेदिवशी सिल्क चेन्नईला पळून गेली. चेन्नईमध्ये ती आपल्या एका काकूसोबत राहू लागली. तिथेच तिने दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सिल्क स्मिताच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत, सोबतची तिची छायाचित्रेसुद्धा आहेत...
पुढील स्लाईडमध्ये वाचा, मेकअप आर्टिस्टच्या रुपात केली होती करिअरला सुरुवात...