आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death Anniversary Special :Funeral Pics Of A K Hangal

पुण्यतिथी : ए. के. हंगल यांना अखेरचा निरोप द्यायला शशी कपूर यांच्यासह पोहोचले होते हे कलाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[ए के हंगल यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झालेले शशी कपूर (डावीकडे) आणि उजवीकडे त्यांना खांदा देताना अवतार गिल]
मुंबई - 1975च्या 'शोले' या सुपरहिट सिनेमातील रहीम चाचा अर्थातच अभिनेते ए. के. हंगल यांनी 26 ऑगस्ट 2012 रोजी या जगाचा निरोप घेतला. शशी कपूर, प्रियांका चोप्रा, अर्जुन रामपाल, दीया मिर्झा, अवतार गिल, डॅनी डेन्जोंगपा, रंजीत, रजा मुराद, इला अरुणसह अनेक कलाकारांनी या ज्येष्ठ अभिनेत्याला अखेरचा निरोप दिला होता.
मात्र त्यांच्यासह 'शोले' या सिनेमात काम करणारे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, सचिन हे कलाकार यावेळी दिसले नव्हते. ए. के. हंगल यांना केवळ अभिनेत्याच्या रुपातच नव्हे तर फ्रिडम फाइटर म्हणूनही ओळखले जाते. 1929 ते 1947 या काळात त्यांनी स्वातंत्र्य लढाईत आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
2006 मध्ये ए. के. हंगल यांनाबॉलिवूडमधील महत्त्वपूर्ण योगदानासाठी पद्मभूषण सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. अनेक सिनेमांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारणा-या ए. के. हंगल यांनी आपले शेवटचे दिवस हलाखीच्या परिस्थितीत काढले. शेवटच्या काळात त्यांच्याकडे उपचारासाठीसुद्धा पैसे नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना उपचारासाठी 50 हजारांची मदत दिली होती. शिवाय जया बच्चन, मिथून चक्रवर्ती, सलमान खान या कलाकारांनीसुद्धा त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला होता.
'शोले' या सिनेमाशिवाय त्यांचे गाजलेले निवडक सिनेमे पुढीलप्रमाणे :
शागिर्द (1967), बावर्ची (1972), अभिमान (1973), नमक हराम (1973), आपकी कसम (1974), दीवार (1975), चितचोर (1976), ईमान धरम (1977), बेशरम (1978), खानदान (1979), जुदाई (1980), नरम गरम (1981), शौकीन (1982), अवतार (1983), शराबी (1984), मेरी जंग (1985), डकैत (1987), खून भरी मांग (1988), फरिश्ते (1991), खलनायक (1993), दिलवाले (1994), शरारत (2002) आणि पहेली (2005)
पुढे पाहा, ए. के. हंगल यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झालेल्या कलाकारांची छायाचित्रे...