आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death On The Sets Of Salman Khan’S Bajrangi Bhaijaan

सलमानच्या सिनेमाच्या सेटवर काम करताना लाइटमनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान)
मुंबई- बातमी आहे, की सलमान खानच्या 'बजरंगी भाई' या आगामी सिनेमाच्या सेटवर 36 वर्षीय लाइटमनचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (10 डिसेंबर) घडल्याचे कळते. बातम्यांनुसार, 36 वर्षीय मुनीब अंसारी करजात परिसरातील एन डी स्टुडिओमध्ये सिनेमाच्या सेटवर काम होता आणि अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. सेटवरच त्याचा मृत्यू झाला.
स्टुडिओचे जनरल सेक्रेटरी गंगेश्वर श्रीवास्तवने एका पब्लिकेशनसोबत बोलताना घटनेचे स्पष्टीकरण दिले. अलाइड कर्मचारी यूनिअननेसुध्दा या घटनेचे स्पष्टीकरण देताना सांगितले, की मुनीबचा सकाळची शिफ्ट हॉटेलमध्ये होती. त्यावेळी त्याला काम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.
बातम्यांनुसार, मुनीब 13 वर्षांपासून लाइटमनच्या रुपात काम करत होता. त्यामुळे कामगारांनी मुनीबच्या मृत्यूनंतर सात लाखांची मागणी केली आहे. हे पैसे दिग्दर्शक कबीर खान देणार असल्याचे कळते. मुनीबच्या निधनावर दु:ख व्यक्त करत कबीर म्हणाला, 'हृदयविकाराच्या झटक्याने मुनीबचा मृत्यू झाला आणि हे ऐकून मला खूप दु:ख झाले. तो माझ्यासोबत 'फँटम'मध्येसुध्दा काम करणार होता.'
नोट: 'बजरंग भाईजान' हा दिग्दर्शक कबीर खानचा सिनेमा आहे. त्यामध्ये सलमान खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे. 17 जुलै 2015 रोजी सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे.