दीक्षा सेठ
मुंबई - 'लेकर हम दीवाना दिल' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या दीक्षा सेठसाठी लाइट, कॅमेरा आणि अॅक्शन हे शब्द नवीन नाहीत. दीक्षा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. अल्लू अर्जुन, रवी तेजा, प्रभाष आणि गोपीचंद यांसारख्या साऊथच् या स्टार्सह दीक्षाने काम केले आहे. याशिवाय फेमिना मिस इंडिया 2009 या स्पर्धेची दीक्षा फायनलिस्ट आहे. तामिळ आणि तेलगूमध्ये आत्तापर्यंत दीक्षाचे सात सिनेमे रिलीज झाले आहेत.
दीक्षाचा जन्म 14 फेब्रुवारी 1990 रोजी दिल्लीत झाला. तिचे वडील आयटीसीमध्ये कामाला होते आणि देशभरातील विविध शहरांत त्यांची ट्रान्सफर व्हायची. त्यामुळे दीक्षाचे शिक्षण विविध शहरांत झाले. मुंबई, चेन्नई, कोलकाता, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये दीक्षाचे शिक्षण झाले. महाविद्यालयीन जीवनात असताना अंडरवॉटर आर्कियोलॉजिस्ट होण्याचे दीक्षाचे स्वप्न होते.
'वेदम' या तेलगू सिनेमाद्वारे अभिनेय क्षेत्रात पदार्पण...
2009मध्ये कॉलेजच्या फस्ट इयरदरम्यान दीक्षाने फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. मॉडेलिंगमध्ये काम करण्याचा अनुभव यावेळी तिच्या कामी पडला आणि ती टॉप 10 मध्ये स्थान प्राप्त करण्यात यशस्वी ठरली.
या स्पर्धेत दीक्षाने फ्रेश फेसचा खिताब आपल्या नावी केला. त्यानंतर हैदराबादमध्ये एका मॉडेलिंग असाईन्मेंटदरम्यानल 'वेदम' या तेलगू सिनेमाच्या कास्टिंग दिग्दर्शकाची नजर दीक्षावर पडली आणि त्यांनी तिची भेट दिग्दर्शक कृषसोबत घालून दिली.
कृष यांनी यापूर्वी या सिनेमासाठी 70 अभिनेत्रींना रिजेक्ट केले होते. दीक्षाचे ऑडीशन घेतल्यानंतर तिची या सिनेमासाठी निवड झाली. येथूनच दीक्षाच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली. या सिनेमात तिच्यासह दाक्षिणात्य स्टार अल्लू अर्जुन होता. त्यांतर रवी तेजा स्टारर 'मीरपाकाय' या सिनेमात दीक्षा झळकली. दोन्ही सिनेमांतील दीक्षाच्या अभिनयाचे विशेष कौतूक झाले. या सिनेमांनंतर दीक्षाने 'वांटेड', 'राजापट्टाई', 'निप्पू', 'रेबल' आणि 'वेट्टाई मन्नन' या तेलगू सिनेमांमध्ये काम केले.
'लेकर हम दीवाना दिल'कडून विशेष अपेक्षा...
राजकपूर यांचा नातू अरमान जैनसह दीक्षा 'लेकर हम दीवाना दिल' या सिनेमात झळकली आहे. या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अलीकडेच एका मुलाखतीत तिने सांगितले होते, की दक्षिणेप्रमाणेच बॉलिवूडमध्येही तिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करेल, अशी आशा दीक्षाने व्यक्त केली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दीक्षा सेठची निवडक 15 छायाचित्रे...