आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepak Sawant, Sangeeta Khanna, Vikram Gaikwad, Vipul Bhagat\'s Interview

जेव्हा स्मिता पाटील यांच्या मृतदेहाचा केला गेला होता मेकअप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रिया सोगले
रुपेरी पडद्यावर सौंदर्याची जादू परसवणारे स्टार्स आणि त्यांचे लखलखते आयुष्य, ग्लॅमरने प्रभावित होणारे प्रेक्षक. जेव्हापासून भारतात सिनेमांची सुरूवात झाली तेव्हापासून आतापर्यंत ते समाजाचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून राहिले आहेत. लोकांवर सिनेमाचा मोठा प्रभाव दिसून येतो. सिनेमाप्रेमी रुपेरी पडद्यावर दिसणा-या सुंदर कलाकारांप्रमाणे बनण्याची इच्छा मनात ठेवतात.
परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही लोकांना भेटवणार आहोत जे या कलाकारांना सुंदर बनवतात आणि त्यांचे सौंदर्य रुपेरी पडद्यावर दाखवतात. या लोकांना तुमच्यामधील अनेकांनी यापूर्वी यांना कधीच बघितले नसेल. यांच्याविषयी त्यांना काहीच ठाऊक नसेल. परंतु हेच आहेत ते लोक जे स्टार्सच्या चेह-याना चमकवतात आणि त्यांना सुंदर बनवतात.
दीपक सावंत, अमिताभ बच्चन यांचे मेकअप मॅन
दीपक सावंत मागील 40 वर्षांपासून अमिताभ बच्चन यांचे मेकअप मॅन आहेत. 70च्या दशकापासून आतापर्यंत ते या कामात सक्रिय आहेत. अमिताभ यांच्याव्यतिरिक्त दिलीप कुमार, स्मिता पाटीलसारख्या कलाकारांचे मेकअप त्यांनीच केले आहे. त्यांचे म्हणणे आहे, की आता मेकअप आणि त्याच्या पध्दतीत पूर्वीपेक्षा आता खूप बदल झाला आहे. दीपक सावंत म्हणतात, 'पूर्वी मेकअप खूप साधा असायचा. त्यावेळी एकच अजेंडा असायचा, की कलाकाराला सुंदर दिसायचे आहे. सिनेमात नायक-नायिका श्रीमंत आहे, की गरीब याचा काहीही फरक मेकअपमध्ये पडत नसे. सर्व कलाकारांचा मेकअप एकसारखाच असायचा.'
मानधानाविषयी विचारल्यानंतर दीपक म्हणतात, 'आता मेकअप मॅनला चांगले मानधन मिळायला लागले आहे. पूर्वी त्यांच्याजवळ भरपूर काम नव्हते. ज्यांच्या जवळ काम होते त्यांना महिन्याला फक्त 200 रुपये मानधन मिळायचे. मग नंतर हळू-हळू दोनशे वरून पाचशे नंतर हजार, पाच हजार असे वाढत गेले. अशाप्रकारे हळू-हळू मानधन वाढायला लागले. आता तर चेह-याप्रमाणे पैसे मिळायला लागले आहेत.'
दीपक सावंत पुढे म्हणतात, की जेव्हा 80च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी राजकिय क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा त्यांनी स्मिता पाटील यांच्यासोबत काम केले. तेव्हा स्मिता त्यांना म्हणायच्या, 'दीपकजी तुम्ही नसता तर मी मसाला सिनेमांमध्ये कधीच काम करू शकले नसते.
दीपक सावंत यांनी सांगितले, की स्मिता पाटील यांची इच्छा होती, की मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह एखाद्या विवाहित महिलेप्रमाणे सजवावा. जेव्हा स्मिता पाटिल यांचे अकाली निधन झाले तेव्हा त्यांचा मृतदेह तीन दिवस बर्फात ठेवण्यात आला होता. कारण स्मिता यांची बहीण अमेरिकेमध्ये राहत होती.
दीपक म्हणतात, 'जेव्हा स्मिता यांच्यावर अत्यंसंस्काराची वेळ आली त्यापूर्वी मी त्यांच्या मृतदेहाचा विवाहित महिलेप्रमाणे मेकअप केला.'
संगीता खन्ना
आजपासून 10-12 वर्षांपूर्वी संगीता यांनी करिअरची सुरूवात केली होती. त्यावेळी लोक त्यांना 'ब्यूटीशिअन' म्हणून ओळखत होते. परंतु आता लोकांचा दृष्टिकोण बदलला आहे.
संगीता मानतात, की मेकअप इंडस्ट्रीमध्ये खूप काम वाढले असून पैसेही तसेच मिळतात. परंतु भारतीय मेकअप आर्टिस्टला परदेशी मेकअप आर्टिस्टची मोठी टक्कर आहे.
त्या म्हणतात, 'आजकाल नवीन ट्रेंडची सुरूवात झाली आहे. निर्माते परदेशी मेकअप आर्टिस्टला सहजरित्या काम देतात. त्यांना भारतीय मेकअप आर्टिस्टपेक्षा जास्त मानधन दिले जाते.'
संगीता असेही म्हणतात, की 'महिलांना हेअरस्टाइलचे सर्वधिक काम मिळते. त्यामुळे महिलांना मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात कमी काम असते या विचारानेच कदाचित कमी मेकअप आर्टिस्ट महिला ब़ॉलिवूडमध्ये जातात. महिला आर्टिस्टला कोणते प्रोत्साहनसुध्दा मिळत नाही.'
विपुल भगत
विपुल भगत हे एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. बॉलिवूडमध्ये 27 वर्षे काम केलेल्या विपुल यांनी जेव्हा सुरूवातीला या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आई-वडीलांनी नकार दिला होता. परंतु विपुल आज एक यशस्वी पुरूष बनले आहेत.
त्यांनी अनेक फॅशन शो आणि सिनेमांमधील अभिनेत्रींचा मेकअप केला आहे. मलायका अरोरा खानसुध्दा त्यांची जवळची मैत्रीण आहे. विपुल सांगतात, की बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या विनामेकअप घराबाहेर पाऊल ठेवत नाहीत.
मेकअपच्या तंत्रात झालेल्या बदलांविषयी विपुल म्हणतात, 'पूर्वी मेकअप खूप जास्त असायचा. आता सौंदर्यप्रसाधनांच्या जगात खूप बदल झाला आहे. अनेक मोठ्या आणि प्रसिध्द कंपन्या मेकअपचे साहित्य बनवतात. बाजारात सर्वकाही सहजरित्या मिळायला लागले आहे.'
विक्रम गायकवाड
विक्रम गायकवाड हेसुध्दा सिनेमांमातील एक प्रसिध्द व्यक्तिमत्व आहेत. ते सध्या दिवाकर बनर्जीच्या 'ब्योमकेश बक्शी', करण मल्होत्राच्या 'शुध्दी' आणि राकेश ओमप्रकाश मेहराच्या एका सिनेमांमध्ये काम करत आहेत.
त्यांना 'द डर्टी पिक्चर'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
विक्रम यांनी एक गंमतीशीर आठवण सांगितली, 'मेकिंग ऑफ महात्मा'ची शुटिंग दक्षिण अफ्रिकेत चालू होती. तेव्हा एका ब्रिटीश कलाकाराने बनावट मिशा लावल्या होत्या. जिथे शुटिंग चालू होती ती जागा जोहान्सबर्गपासून चारशे किलोमिटर दुर होती. त्यावेळी मेकअप व्हॅन वेळेवर पोहोचली नव्हती. त्यामुळे त्या कलाकाराला घोड्याच्या मिशा लावाव्या लागल्या होत्या.'
विक्रम गायकवाड म्हणतात, की वेळेनुसार मेकअप मॅनची प्रतिष्ठासुध्दा बॉलिवूडमध्ये वाढते. परंतु ते महिला आणि पुरूष मेकअप आर्टिस्ट यांच्यामध्ये भेदभाव करत नाही. ते होणा-या भेदभावामुळे दु:खी आहेत.