आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Deepika And Ranveer Singh Spotted In Barcelona Again

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बार्सिलोनामध्ये एकत्र दिसले रणवीर-दीपिका, फोटो झाला व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या फोटोमध्ये दीपिकाने पांढरा टॉप घातला आहे, तर तिच्या मागे काळ्या आणि पांढ-या रंगाचा शर्ट घातलेला रणवीर उभा आहे. सोबतच प्रियंका चोप्रादेखील काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे.
मुंबई. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचं अफेअर, हा सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. 'गोलियों की रासलीला रामलीला' या सिनेमात हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले. या सिनेमादरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या आल्या आणि प्रदर्शनानंतर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या. त्यांनी मात्र कधीच आपलं नातं सर्वांसमोर स्वीकारलं नाही, तरी मिडीयात यांच्याबद्दल सतत बातम्या झळकत राहिल्या. आता या सगळ्या गोष्टींना बराच काळ उलटल्यानंतर, पुन्हा एकदा या दोघांना बार्सिलोना येथे एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
कदाचित रणबीर कपूरसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे दीपिका रणवीर सिंह याच्याशी असलेलं नातं उघडपणे स्वीकारत नसेल, परंतू बहुतेक तिला रणवीरचा दुरावाही सहन होत नाहीये असं दिसतंय. इंटरनेटवर सध्या या दोघांचा एक फोटो गाजत आहे, ज्यात दोघं बार्सिलोनामधल्या एका रेस्तरॉमध्ये आहेत. रिपोर्टसनुसार ही एक सामान्य लंच डेट नाहीये. रणवीर आपला आगामी सिनेमा 'दिल धडकने दो'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अर्थात दोघं ज्या फोटोत एकत्र दिसत आहेत, त्या फोटोच्या खरेपणाला पुरावा नाहीये, तसंच फोटो कोणी काढला हेही कळू शकलं नाहीये. परंतू फोटो इंटरनेटवर सध्या व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर फोटोत त्यांच्यासोबत प्रियंका चोप्रादेखील दिसत आहे.
फोटोत रणवीरचा बदललेला अवतार दिसत आहे. आतापर्यंत वाढलेले केस आणि दाढी-मिश्यांत दिसणारा रणवीर फोटोत मात्र क्लीन शेव्ह आणि बदललेल्या हेअरकटमध्ये दिसतोय. त्याचा हा लूक झोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' या आगामी सिनेमासाठी आहे असं मानलं जातंय. या सिनेमात रणवीर सिंह आणि प्रियंका चोप्राशिवाय रणवीरची एक्स गर्लफ्रेंड अनूष्का शर्मादेखील दिसणार आहे. काहीदिवसांपुर्वीच दीपिका आणि रणवीर बार्सिलोनाच्या रस्त्यांवर एकत्र दिसले. दोघं आनंदी वाटत होते. त्यांनी बार्सिलोनात शॉपिंग केली तसंच तिथल्या स्थानिक जेवणाचादेखील आस्वाद घेतला. मजेशीर गोष्ट म्हणजे यापुर्वी दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर आणि त्याची गर्लफ्रेंड कतरिना कैफला स्पेनच्या समुद्रकिनाऱ्यावर स्पॉट केले गेले होते. दोघांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. आता रणवीर आणि दीपिकादेखील असेच बीचवर जाणार की या सगळ्यापासून दुर राहणेच पसंत करणार हे लवकरच कळेल.