आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Revealed : पाहा दीपिका-अर्जुनच्या \'फाइंडिंग फॅनी\'चा FIRST LOOK

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपिका पदुकोणने आपल्या नवीन लूकचे हे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले)
अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या प्रत्येक सिनेमात काही तरी नावीण्यपूर्ण करु इच्छिते. मग ती सिनेमातील भूमिका असो किंवा लूक. आपल्या आगामी फाइंडिंग फॅनी या सिनेमात दीपिकाने नवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
होमी अदजानिया यांच्या या कॉमेडी सिनेमातील दीपिकाचा नवीन लूक समोर आला आहे. आपल्या नवीन लूकचे छायाचित्र दीपिकाने ट्विटरवर शेअर केले आहे. हे छायाचित्र गोवा येथील शूटिंगदरम्यानचे आहे. सैफ अली खान आणि दिनेश विजान या सिनेमाचे निर्माते आहेत.
सिनेमात दीपिकाच्या पात्राचे नाव 'अग्नि' आहे. हिंदीसह इंग्रजी आणि कोकणी भाषेत तयार होत असलेला हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या सिनेमात दीपिकासह अर्जुन कपूर मेन लीडमध्ये आहे. या दोघांसह नसीरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया आणि पंकज कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. गोव्यातील रोज जर्नीपर हा सिनेमा आधारित आहे.