आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बी, दीपिकाने लाँच केला \'पिकू\'चा ट्रेलर, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण)
मुंबई- बिग बी, दीपिका पदुकोण आणि इरफान खान अभिनीत 'पिकू' सिनेमाचा ट्रेलर बुधवारी (25 मार्च) ट्रेलर लाँच करण्यात आला. सुजित सरकारच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांनी वडील-मुलीची भूमिका साकारली आहे.
ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये दीपिका पदुकोण, आमिताभ बच्चन, इरफान खानसह दिग्दर्शक सुजिन सरकारसुध्दा उपस्थित होते. येथे दीपिका, मिनिषा शाहच्या डिझाइन आऊटफिट्समध्ये दिसली. तिने स्ट्रिप टी-शर्टसोबत मिलिट्री प्लीटेड बटन स्कर्ट कॅरी केले होते.
यावेळी दीपिका आणि बिग बी मस्तीच्या मूडमध्ये दिसले. त्यांनी सिनेमाशी निगडीत आपले अनुभव शेअर केले. बिग बींनी सांगितले, की शूटिंग संपताच ते खूप दु:ख व्हायचे.
दीपिकाने अमिताभ आणि अभिषेक बच्चनसोबत स्क्रिन शेअर केली आहे. यावर तिला बिग बी आणि ज्यूनिअर बीमध्ये कोण चांगला को-स्टार असल्याचे विचारले गेले. यावर दीपिका म्हणाली, 'अभिषेक काम करण्यात मजा येते, आमिताभ यांच्यासोबत खूप काही शिकायला मिळते. माझी आणि बिग बींची केमिस्ट्री ऑर्गेनिक आहे.'
8 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा एमएसएस मोश पिक्चर्स, सरस्वती एंटरटेन्मेंट क्रिएशन लिमिटेड आणि रायजिंग फिल्म्सने निर्मित केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाह ट्रेलर लाँचिंगदरम्यानचे स्टार्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...