आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Matching कपडे परिधान करुन रणवीर-दीपिकाची Outing, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेत्री रणवीर सिंह यांच्या अफेअरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये रंगत आहे. अवॉर्ड फंक्शन असो, बर्थ डे पार्टी असो किंवा एखाद्या कलाकाराचे लग्न, रणवीर आणि दीपिका नेहमी एकत्र दिसतात.
13 एप्रिलच्या संध्याकाळीसुद्धा रणवीर आणि दीपिका एकत्र दिसले. या दोघांनी विकेंड एकत्र सेलिब्रेट केला. विशेष म्हणजे यावेळी दोघांनीही सारखे कपडे परिधान केले होते. यावरुन हे दोघे एकमेकांना किती पसंत करतात, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनीही रविवारी रात्री मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकत्र जेवणाचा आनंद घेतला. आउटिंगला जाताना या दोघांनीही सारख्या रंगाचे कपडे घालणे पसंत केले होते. दीपिकाने स्लिव्हलेस व्हाइट टॉप परिधान केला होता तर रणवीरसुद्धा व्हाइट टी शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. शिवाय त्याने डोक्यावर स्टायलिश कॅप घातली होती. इतकेच नाही तर रणवीर आणि दीपिकाचे बूटसुद्धा सारखे होते. या दोघांनी व्हाइट शूज घातले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा रणवीर-दीपिकाची खास छायाचित्रे...
(फोटो- योगेन शाह)