आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone And Salman Khan To Work Together

आता सलमानची हिरोईन बनणार दीपिका, यशराजने केले साइन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या वर्षी अभिनेता सलमान खान आणि दीपिका पदुकोण यांचे एकत्र सिनेमात काम करण्याचे योग जुळून आले होते. मात्र तारखा आणि कथेमुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे हे शक्य झाले नाही. राजश्री बॅनरच्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमासाठी सलमानसह दीपिकाच्या नावाची चर्चा होती. मात्र हा सिनेमा मिळाला सोनम कपूरला. काही तरी कारणामुळे सलमान आणि दीपिकाचे एकत्र काम करणे रखडत गेले.
अखेर यशराज बॅनरचा सर्वेसर्वा आदित्य चोप्राने या दोघांना एका सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आणले आहे. सलमान खानचे बिझी शेड्युल बघता यशराज बॅनरने आपल्या अद्याप नाव न ठरलेल्या सिनेमासाठी त्याच्या तारखा घेतल्या आहेत. खरं तर या सिनेमात सलमानसह एका नवोदित चेह-याला कास्ट करण्याचा आदित्य चोप्राचा मानस होता. मात्र अखेर अभिनेत्री म्हणून
दीपिकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
दीपिकानेसुद्धा सिनेमासाठी आपला होकार कळवला आहे. हा सिनेमा 2016मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. सिनेमाची रिलीज डेट निश्चित झाली आहे. पटकथासुद्धा तयार आहे. लवकरच या सिनेमाविषयी अधिकृतरित्या घोषणा करण्यात येणार आहे.
सलमान सध्या 'किक'च्या रिलीजसह 'प्रेम रतन धन पायो' आणि कबीर खानच्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. कबीर खानच्या या सिनेमात सलमानसह करीना कपूर झळकणार आहे.