(चाहत्यांसोबत दीपिका पदुकोण)
मुंबई: 16वे मुंबई फिल्म फेस्टिव्हल (MAMI) 2014 सुरु झाले आहे. 14 ते 21 ऑक्टोबरपर्यंत चालणा-या या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स सामील होणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये पहिल्या दिवशी बॉलिवूडचे बरेच सेलेब्स दिसले. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि हुमा कुरेशीसुध्दा या फेस्टिव्हलमध्ये सामील झाल्या.
दीपिका या फेस्टिव्हलमध्ये पोहोचल्यानंतर चाहत्यांनी तिला घेरले. ती यावेळी गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.
आपल्या लूकमध्ये भर टाकण्यासाठी तिने ओठांवर गडद लाल रंगाची लिपस्टिक लावलेली होती. दीपिकाने कोणतीच ज्वेलरी घातलेली नव्हती. तिच्यासह अभिनेत्री हुमा कुरेशीसुध्दा दिसली. हुमाने ब्लॅक-व्हाइट कॉम्बिनेशन असलेला ड्रेस परिधान केलेला होता.
दीपिकाने यावेळी चाहत्यांसोबत सेल्फी घेतले. या दिवाळीला तिचा 'हॅपी न्यू इअर' सिनेमा रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा MAMI फेस्टिव्हलमध्ये पोहोचलेल्या दीपिका आणि हुमाचा ग्लॅमरस लूक...