आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी टाऊनची सर्वात महागडी अभिनेत्री आहे दीपिका, जाणून घ्या अभिनेत्रींच्या मानधनाचा आकडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(फाइल फोटो - दीपिका पदुकोण)
अभिनेत्री दीपिका पदुकोण बी टाऊनमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. आपल्या सात वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये दीपिकाने आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान पटकावले आहे. आज दीपिका आपला 29 (5 जानेवारी 1986) वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिका पदुकोणचे सिनेमे म्हणजे यशाची हमखास गॅरंटी ठरु लागले आहेत.
दीपिका पदुकोण इंड्स्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. 2013-14 हे वर्ष दीपिकासाठी खूप चांगले ठरले. 'रेस-2', 'कॉकटेल', 'ये जवानी है दीवानी', 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'गोलियों की रासलीला-राम लीला', 'हॅपी न्यू इयर' हे एकामागून एक हिट सिनेमे दिले. या सर्व सिनेमांमधील दीपिकाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.

'रामलीला' या सिनेमानंतर दीपिका संजय लीला भन्साळी यांची आवडती अभिनेत्री ठरली आहे. आपल्या आगामी बाजीराव मस्तानी या सिनेमात संजय यांनी दीपिकाला कास्ट केले आहे. इतकेच नाही तर या एका सिनेमासाठी दीपिकाने तब्बल आठ कोटींचे मानधन घेतले आहे. एवढे मानधन घेऊन दीपिकाने इंडस्ट्रीतील सर्व अभिनेत्रींना मागे टाकले आहे. यापूर्वी दीपिका आपल्या एका सिनेमासाठी तीन कोटी रुपये फिस म्हणून घेत होती. 'बाजीराव मस्तानी'मध्ये दीपिकासह रणवीर सिंह झळकणार आहे.
जाणून घ्या दीपिकाच्या कमाई आणि लाइफ स्टाइलविषयीच्या खास गोष्टी...
  • फोर्ब्सच्या 2014च्या आकड्यांनुसार दीपिकाची एकुण कमाई 67.20 कोटी इतकी आहे.
  • 2012च्या फोर्ब्स सेलिब्रिटी 100 च्या यादीत दीपिका 22व्या क्रमांकावर होती. यामध्ये दीपिकाने सोनम कपूर, ऐश्वर्या राय बच्चन यांना मागे टाकले होते.
  • दीपिका आपल्या एका सिनेमासाठी आठ ते नऊ कोटींपर्यंत मानधन घेतेल. 2013मध्ये आलेल्या एकामागून एक हिट सिनेमांनंतर तिच्या फीसमध्ये वाढ झाली आहे.
  • दीपिका अनेक महागडे ब्रॅण्ड्स अँडोर्स करत आहे. बातम्यांनुसरा, पॅराशूट ब्रॅण्डच्या एन्डॉर्समेंटसाठी पाच कोटी रुपये मानधन घेतले.
  • दीपिका किंगफिशर कॅलेंडर गर्ल आहे. याशिवाय किंगफिशरच्या पाचव्या एडिशनची ती मॉडेल ऑफ द इयर ठरली होती.
  • दीपिकाकडे एकुण तीन लग्झरी गाड्या असून त्यामध्ये BMWचा समावेश आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडची कोणती अभिनेत्री किती मानधन घेते, ते सांगत आहोत...