नवी दिल्ली - बॉलिवूड बाला दीपिका पदुकोणने तिच्या क्लीवेजसंबंधातील बातमीला जोरदार विरोध केल्यानंतर तिला सर्वस्तरातून समर्थन मिळत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद
केजरीवाल यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि बॉलिवूडच्या स्टार्सनी ज्या दैनिकात ती बातमी प्रकाशित झाली होती त्या इंग्रजी दैनिकावर
ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.
केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाच्या ट्विटर हँडलवर दीपिकाच्या बाजूने ट्विट केले आहे. त्याआधी दीपिकाने रागाने लालेलाल होत म्हटले होते, 'होय, मी एक महिला आहे आणि माझ्याकडे ब्रेस्ट आणि क्लिवेज आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम?'
काय आहे प्रकरण
एका इंग्रजी दैनिकाने दीपिकाच्या क्लिवेजवर फोकस करणारी एक बातमी प्रकाशित केली होती आणि ती ट्विटरवर शेअर केली होती. एक वर्षांपूर्वी दीपिका अनिता श्रॉफ अदजानिया यांनी डिझाइन केलेला कट ड्रेस परिधान करुन चेन्नई एक्स्प्रेसच्या ट्रेलर लॉन्चला गेली होती. त्या दरम्यान तिच्या क्लिवेजवर फोकस करुन फोटो काढण्यात आले होते.
बातमीवर दीपिका भडकली
दीपिकाने जेव्हा ही बातमी पाहिली तेव्हा तिचा पार चढला आणि ती रागाने लाल झाली. ती म्हणाली होती, 'देशातील प्रमुख वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केले आहे. ही बातमी आहे का? होय, मी एक महिला आहे आणि माझ्याकडे ब्रेस्ट आणि क्लिवेज आहे. याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? जर तुम्हाला महिलांचा सन्मान करता येत नसेल तर महिला सशक्तीकरणाचा गप्पा मारू नका.'
(छायाचित्र - अभिनेत्री दीपिकाचे संग्रहित छायाचित्र)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, या प्रकरणावर केजरीवाल यांचे दीपिकाच्या समर्थनातील ट्विटस