आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY: दीपिकाला व्हायचे नव्हते अभिनेत्री, जाणून घ्या रंजक गोष्टी आणि पाहा तिचा नॉटी LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज वाढदिवस आहे. तिने वयाची 29 वर्षे आज पूर्ण केली आहेत. दीपिकाचा जन्म 1986मध्ये डेन्मार्कच्या कोपेनहेगनमध्ये झाला. 2007मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि खूप कमी वेळेत फिल्म इंडस्ट्रीत तिने आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान प्राप्त रकेले. ती आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून 2006मध्ये 'फिमेल मॉडल ऑफ द इयर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द इयर'चा मान पटकावला. 'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', आणि 'गोलियों की रासलीला-रामलीला', हॅपी न्यू 'इयर' हे तिचे अलीकडच्या काळातील हिट ठरलेले सिनेमे आहेत.
वडील आहेत प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू...
दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅवल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे.
छंद म्हणून केली होती मॉडेलिंग...
बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कॅरमल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता. परंतु आज ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे.
कन्नड सिनेमातून झळकली पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर...
दीपिकाने बॉलिवूडमध्ये 'ओम शांती ओम' सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा 2007मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अ‍ॅक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा 'ऐश्वर्या' हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. त्यानंतर दीपिकाने 'ओम शांती ओम' हा सिनेमा साइन केला.
अनेक सेलिब्रिटींसोबत जुळले नाव...
दीपिकाच्या खासगी आयुष्यविषयी सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले आहे. रणबीर कपूर, निहार पांड्या, सिध्दार्थ माल्या हे तिच्या लव्ह लिस्टमध्ये सामील आहे. आता रणवीर सिंहसोबत तिचे अफेअर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दोघांना अनेक पार्टीमध्ये एकत्र बघितल्या गेले. रणवीरसोबत ती लग्नगाठीत अडकणार की हे नातेही केवळ चर्चा ठरणार, हे येणा-या दिवसांत कळेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दीपिका पदुकोणचा दिलखेचक ग्लॅमरस अंदाज....