आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone On Cleavage Row Latest News In Marathi

दीपिका म्हणाली, शारीरिक कौतुकावर प्रॉब्लेम नाही, क्लीवेज प्रकरणानंतर लिहिला लेख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपिकाच्या फेसबुक पेजवरून घेतलेला फोटो.)

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण क्लीवेज पाटर्स संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेले वृत्त आणि त्यानंतर तिने चढवलेला हल्ला यावरुन अजूनही गोंधळ सुरू आहे. याबाबत दीपिकाने फेसबुक पेजवर एक लांब लचक पोस्ट लिहिली आहे. यात तिने म्हटले आहे, की वाचकांना आकर्षित करण्यासाठी वृत्तपत्राने असे हेडिंग दिले होते. मला माझ्या शारीरिक कौतुकाने काही समस्या नाही. परंतु, लोकांनी रोल आणि रिअल लाईल यातील फरक समजून घ्यायला हवा. चित्रपटाच्या पडद्याव्यतिरिक्तही एखाद्या महिलेला सन्मान मिळायला हवा. एखाद्या नायिकेचा चित्रपटात कसा रोल आहे यावरुन ती कपडे परिधान करीत असते.
मी कपडे घालायचे की नेकेड राहायचे हे कॅरेक्टर ठरवित असते
दीपिकाने लिहिले आहे, की मला माझा व्यवसाय माहित आहे. मी डोक्यापासून पायांच्या नखापर्यंत कोणते कपडे घालायचे की नेकेड राहायचे हे कॅरेक्टर ठरवित असते. ती भूमिका करायची की नाही याचा निर्णय कलाकाराकडे असतो. तोकडे कपडे घालणे हा रोल असतो, ते समजायला हवे. ही रिअल लाईफ नसते. हा माझा व्यवसाय आहे. मला माझ्या कॅरेक्टरला न्याय द्यायचा असतो.
दीपिका म्हणाली, की माझ्या शारीरिक कौतुकावर माझा आक्षेप नाही. एखादे कॅरेक्टर सादर करताना मी मनात कोणत्याही प्रकारची लज्जा ठेवत नाही. एवढेच नव्हे तर माझी पुढील भूमिका एका बार डान्सरच्या रुपात आहे. मला एवढेच वाटते, की एखाद्या महिलेला ऑफ स्क्रिनही सन्मान मिळायला हवा.
दीपिकाने लिहिलेले पत्र वाचा जशेच्या तशे....पुढील स्लाईडवर क्लिक करा...