(डावीकडून- इव्हेंटदरम्यान दीपिका पदुकोणसह रणवीर सिंह आणि श्रध्दा कपूरसह वरुण धवन)
मुंबई: अर्जुन कपूर आणि दीपिका पदुकोणचा 'फाइंडिंग फॅनी' या आगामी सिनेमाची बुधवारी (3 सप्टेंबर) स्क्रिनिंग आयोजन करण्यात आले होते. या स्क्रिनिंगमध्ये बी-टाऊनचे काही यंगस्टार्स दिसले. दीपिकाचा कथित बॉयफ्रेंड रवीर सिंहसुध्दा स्क्रिनिंगमध्ये पोहोचला होता.
स्क्रिनिंगमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी, सोनाक्षी सिन्हा, सुशांत सिंह राजपूत, कल्कि कोचलिन, वरुण धवन, श्रध्दा कपूर, मोहित मारवाह, तब्बू, अर्जुन कपूर, ईशा गुप्ता, डिनो मारिया, आयुष्यमान खुराणा, नेहा शर्मा, इलियाना डिक्रूज, जॅकी भगनानीसह अनेक सेलेब्स सामील झाले होते. विद्या बालनचा पती सिध्दार्थ रॉय कपूरसह स्क्रिनिंगमध्ये पोहोचली होती. दोघांनी कॅमे-यासमोर अनेक पोझ दिल्या.
'फाइंडिंग फॅनी' होमी अदजानियाने दिग्दर्शित केला असून नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, डिंपल कपाडिया, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर हे दिसणार आहेत. सिनेमा येत्या 12 सप्टेंबरला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'फाइंडिंग फॅनी'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...