आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone Rejects Sanjay Leela Bhansali\'s Offer

संजय लीला भन्साळींचा प्रस्ताव दीपिकाने फेटाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय लीला भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ आणि करण जोहरचा ‘शुद्धी’ चित्रपटाचे कास्टिंग बर्‍याच दिवसांपासून बदलले जात आहे. संजय आपल्या चित्रपटात दीपिका आणि रणवीर सिंह या जोडीला घेणार होते. ‘गोलियों की रासलीला रामलीला’ चित्रपटात दोघांचा अभिनय पाहिल्यानंतर संजयला वाटले की बाजीराव, मस्तानीची भूमिका ही जोडी चांगल्या पद्धतीने साकारू शकते.
नेमकी अशीच परिस्थीती करण जोहरच्या चित्रपटाची आहे. हृतिक रोशन आणि करीना कपूरने चित्रपट सोडल्यानंतर आणि पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केल्यानंतर करणला तत्काळ चित्रपटातील कलाकारांची निवड करणे आवश्यक आहे. करणचे जवळचे लोक सांगतात की त्यालादेखील रणवीर-दीपिका जोडीला चित्रपटात घेण्याची इच्छा आहे. कारण या जोडीव्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये कोणतीच अन्य जोडी सकृतदर्शनी योग्य दिसत नाही.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार दीपिकाने संजयच्या चित्रपटाला नकार कळवत करण जोहरच्या ‘शुद्धी’ चित्रपटाला होकार कळवला आहे. वास्तविक, संजयच्या ‘.रामलीला’ चित्रपटातून दीपिकाच्या कामाची प्रशंसा झाली होती. शिवाय चित्रपटाने 100 कोटींच्या वर व्यवसाय केला होता.