आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone Rise And Rise After Many Controversy

कधी \'क्लीव्हेज\' तर कधी \'रणबीरला कंडोम\', या वादांनी दीपिका आली चर्चेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण)
मुंबई- दीपिका पदुकोणसाठी मागील वर्ष शानदार ठरले. सिनेमातील अभिनयापासून ते अफेअरपर्यंत आणि इतर बातम्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. ती 5 जानेवारी 2015ला 29 वर्षांची झाली. गेल्या वर्षी दीपिकाने भरपूर यश आपल्या पदरी पाडले. मात्र, कधी-कधी ती अनेक बातम्यांमुळे चर्चेचा विषयी ठरली.
गेल्या वर्षी एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, दीपिकाच्या क्लिव्हेजबाबत बातमी प्रकाशित केली होती. यावर दीपिकाने आक्षेप घेऊन टि्वट केले होते, "YES!I am a Woman.I have breasts AND a cleavage! You got a problem!!??।" यानंतर काही वेळानंतर तिने आणखी एक टि्वट करून लिहिले, "Dont talk about Woman's Empowerment when YOU don't know how to RESPECT Women!". दीपिकाच्या या टि्वटनंतर वृत्तपत्राने ती बातमी काढून टाकली होती.
दीपिकाच्या टि्वटनंतर हे प्रकरण मिटले नाही. याचा मोठा वाद निर्माण झाला होता. पहिल्यांदा दीपिका अशा बातम्यांमुळे चर्चेत आली आहे, असे नाहीये.
रणबीरला दिला कंडोम विकण्याचा सल्ला-
दीपिका 'कॉफी विथ करण' (KWK)च्या तिस-या पर्वात आली होती. त्यावेळी तिचे रणबीरसोबत ब्रेक-अप झालेले होते. या शोमध्ये रणबीरची खिल्ली उडवत दीपिका म्हणाली होती, की रणबीरची कंडोमची जाहिरात करायला हवी.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या दीपिकाचे वादग्रस्त मुद्दे...