आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone To Become Amitabh Bachchan\'s Neighbour

बिग बींची शेजारी होणार दीपिका, खरेदी करणार 50 कोटींचा बंगला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपापले स्टारडम एन्जॉय केल्यानंतर लग्न करुन सेटल झालेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि ऐश्वर्या राय बच्चन सध्या आपले घर रिनोव्हेट करण्यात बिझी आहेत. तर सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली दीपिका पदुकोण मुंबईत स्वतःसाठी आलिशान आशियाना घेण्याच्या तयारीत आहे.
सध्या दीपिका मुंबईतील वरळी परिसरात वास्तव्याला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये चर्चा होती, की हे घर तिला तिचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ माल्याने गिफ्ट केले होते. मात्र त्यांचे नाते संपुष्टात आल्यानंतर ही चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगितले गेते. आता दीपिका मुंबईतील अगदी पॉश परिसरात घर खरेदी करत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुहू येथील नागी व्हिला खरेदी करण्याची दीपिकाची इच्छा आहे. या बंगल्याची किंमत तब्बल 50 कोटी इतकी असल्याचे सांगितले जाते. नागी व्हिलाची डिल पूर्ण झाल्यास दीपिका बिग बींची शेजारी बनेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या मुंबईतील जुहू परिसरात आणखी कोणकोणते सेलिब्रिटी वास्तव्याला आहेत...