आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone Worst Dresses And Fashion Blunders At Various Events

कधी पारदर्शक तर कधी शॉर्ट ड्रेसने केली दीपिकाची फजिती, पाहा तिचे Fashion Blunders

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण आज आपला 29वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 17 व्या वर्षी दीपिकाने ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवले. पदार्पणातच 'ओम शांती ओम' या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणा-या दीपिकाला चित्रपटसृष्टीने सहजासहजी स्वीकारले नाही.
दाक्षिणात्य उच्चार आणि अभिनयाचा अभाव यामुळे तिला सिनेसृष्टीत नाव कमाविण्यासाठी परिश्रम करावे लागले. काही खराब चित्रपट आणि चुकीच्या निर्णयानंतर 2009 साली तिला अखेर चांगला ब्रेक मिळाला. सैफ अली खानसोबतच्या 'लव्ह आज कल' चित्रपटातील तिच्या कामाची वाहवा झाली. त्यानंतर आजवर तिने मागे वळून पाहिलेले नाही. आज दीपिका बॉलिवूडमधील आघाडीची आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
ही आघाडीची अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. मात्र पेज थ्री पार्टी आणि सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना अनेकदा दीपिकाचेही फॅशन ब्लंडर झाले आहे. कधी शॉर्ट ड्रेसने तिची फजिती केली तर कधी पारदर्शक कपडे परिधान करुन आल्यानेदेखील तिला लाजिरवाणे व्हावे लागले.
आज आम्ही तुम्हाला दीपिकाच्या अशाच काही फॅशन ब्लंडरची झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत...