आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाला आता होतेय अनुष्काच्या वेदनांची जाणीव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंहसोबत असलेल्या संबंधांबाबत दीपिका पदुकोण कधीच मोकळेपणाने बोलली नाही. मात्र, ज्या वेदना रणवीरची माजी प्रेयसी अनुष्काने सहन केल्या त्या वेदनांची जाणीव आता दीपिकाला होत असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. वस्तुत: रणवीरचा दिखावा करणारा स्वभाव असून प्रेमाचा प्रसार करणे त्याला खूप आवडते.
दीपिकाने यापूर्वीच रणवीरला ताकीद दिली आहे. मात्र, रणवीर कधी छायाचित्रांद्वारे तर कधी वक्तव्यातून आपल्या संबंधांबाबत बोलत असतो. आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्याने दीपिकासोबत जेवताना चाहत्यांना छायाचित्रे काढू दिली. दीपिकाला रणवीरचे हे वागणे अजिबात आवडले नाही. तिने रणवीरला पुन्हा अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करणे बंद करण्यास सांगितले आहे.
सूत्रानुसार, अनुष्कालाही रणवीरकडून हाच त्रास होता. ती त्याला शब्दांवर नियंत्रण ठेवण्यास सांगत असे. एका ब्रेकअपनंतरही रणवीरने आपल्या वागण्यात सुधारणा केली नाही. दीपिकाने रणवीरच्या या नात्याबाबत अद्याप मंजुरी दिलेली नाही.