आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत यांच्या साधेपणा आणि विनम्रपणामुळे इम्प्रेस झाली दीपिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सहसा कुणावर इम्प्रेस होत नसते. मात्र सुपरस्टार रजनीकांत यांनी काही वेळाच्या भेटीतच दीपिकाला आपला फॅन बनवले.
दीपिका आणि रजनीकांत यांची भेट 'कोच्चाडियान' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या मुलाखतीनंतर दीपिकाने म्हटले, की ती रजनीकांत यांचा साधेपणा आणि विनम्रपणा पाहून त्यांची दीवानी झाली आहे.
तसं पाहता दीपिकाला रजनीकांत यांच्यासह बराच वेळ घालवायला मिळाला नाही. मात्र शुटिंगदरम्यान जे दीड दिवस तिने रजनीकांत यांच्यासोबत घालवले ते तिच्यासाठी प्रेरणा देणारे ठरले. तिच्या मते, सेटवर काम करतानाचा रजनीकांत यांचा जोश आणि उत्साह बघण्यासारखा असतो.