आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Podukone's Finding Fenny Fernandis To Be Released In July

जुलैमध्ये येणार दीपिकाचा 'फाइडिंग फॅनी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होमी अदजानियाचे सिनेमे जरा वेगळ्या अंदाजात बनवले जातात. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत त्याची चांगली बाँडिंग आहे आणि ती त्याच्या नवीन सिनेमात दिसणार आहे. दीपिकाने 2012मध्ये होमीच्या 'कॉकटेल' सिनेमात काम केले होते. या सिनेमात दीपिकाची हेअरस्टाइल, आउटफिट आणि तिच्या व्हेरोनिका भूमिकेने तिच्या करिअरचा आलेख उंचावला होता. प्रेक्षकांसह समीक्षकांनीसुध्दा तिच्या या सिनेमाला आणि अभिनयाला पसंत केले होते.
यावर्षी जुलैमध्ये होमी दिग्दर्शित आणि दीपिका अभिनीत 'फाइडिंग फॅनी' हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमा कमी बजेटचा आहे, परंतु या दोघांची लोकप्रियता सिनेमाला खास बनवणार आहे.
एकापाठोपाठ हिट सिनेमे दिल्यानंतर दीपिका या जुलैमध्येसुध्दा प्रेक्षकांना गोवामध्ये शुट करण्यात आलेल्या या छोट्या बजेटच्या सिनेमाची ट्रीट देणार आहे.