आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थला सोडून दीपिका पुन्‍हा रणबीरच्‍या आयुष्‍यात?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर, दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ माल्‍या यांच्‍या प्रेमाचा त्रिकोण एखाद्या जुन्‍या चित्रपटातील कथेप्रमाणेच आहे. आधी रणबीर- दीपिका एकमेकांच्‍या प्रेमात पडतात. काही काळाने दोघे वेगळे होतात. त्‍यानंतर दीपिकाला सिद्धार्थ भेटतो. पण, दीपिका सिद्धार्थला सोडून पुन्‍हा रणबीरकडे जाते.
सूत्रांनुसार, काही दिवसांपूर्वी, एका सार्वजनिक कार्यक्रमात रणबीर- दीपिका एकमेकांशी बराच वेळ गप्‍पा मारत होते. त्‍यावेळी दीपिकाने तिला संगीतात रस असल्‍याचे रणबीरला सांगितले. इतकेच नव्‍हे तर, दीपिकाने रणबीरकडून पियानो शिकण्‍याची इच्‍छाही व्‍यक्‍त केली. या कार्यक्रमाच्‍या दुस-याच दिवशी दीपिकाच्‍या दरवाज्‍यात एक खास भेटवस्‍तू तिची वाट पाहात होती. रणबीरने दीपिकासाठी एक पियानो पाठवला होता.
नुकतेच एका पुरस्‍कार वितरण समारंभात रणबीरने दीपिकाला वाकून नकस्‍कार केला होता. त्‍यावरून, रणबीरला पश्‍चात्‍ताप होतोय असा निष्‍कर्ष बॉलिवूडकरांनी काढला.
दुसरीकडे, दीपिकाचा सध्‍याचा बॉयफ्रेन्‍ड उद्योगपती सिद्धार्थ माल्‍या याने रविवारी ट्विट केले की, 'कोण माझी खरी काळजी घेते आणि कोण नाटकीपणा करते हे आता मला कळून चुकले आहे.'
याआधी प्रत्‍येक मोठ्या कार्यक्रमात एकत्र येणारे दीपिका- सिद्धार्थ आता मात्र वेगवेगळे येतात. त्‍यांच्‍या अशा वागण्‍यामुळे अनेकांच्‍या मनात त्‍यांच्‍यात काहीतरी बिनसले आहे, असा संशय निर्माण झाला आहे.
सिद्धार्थच्‍या या ट्विटनंतर दीपिका तिच्‍या पूर्वीच्‍या बॉयफ्रेन्‍डकडे म्‍हणजेच रणबीरकडे परत जाण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.