आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंडनेसुद्धा म्हटले, 'हॅप्पी बर्थडे कतरिना'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ)
मुंबई - बॉलिवूड दीवा दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या नेहमीच मीडियात येत असतात. मात्र या सर्व अफवांना बाजूला सारत दीपिकाने चक्क कतरिनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरच्या माध्यमातून दीपिकाने कतरिना बर्थ डे विश केला. तिने ट्विट केले, "हॅप्पी बर्थ डे कतरिना. येणारे वर्ष तुझ्या आयुष्यातील सर्वात चांगले वर्ष राहावे, ही शुभेच्छा."
एकेकाळी दीपिका रणबीरची गर्लफ्रेंड होती, तर आता कतरिना त्याची प्रेयसी आहे. बातम्यांनुसार, कतरिनामुळेच रणबीर दीपिकापासून दूर गेला. मात्र दीपिकाने जुन्या सर्व गोष्टी विसरुन रणबीरच्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावरुन आता या दोघींमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, हे स्पष्ट होत आहे.
कतरिनाने यंदाचा आपला वाढदिवस रणबीरसह कोर्सिकामध्ये साजरा केला. विशेष म्हणजे दीपिकासुद्धा कोर्सिकामध्ये असून इम्तियाज अलीच्या आगामी तमाशा या सिनेमाचे शूटिंग करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दीपिकाचे ट्विट...