आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: आमिरसोबत झळकली होती सिनेमात, 6 वर्षांत केला 80 देशांचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री दीप्ती भटनागर)
मुंबई: भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी रुपेरी पडद्यापेक्षा छोट्या पडद्यावर नाव कमावले आहे. दीप्ती भटनागर त्यापैकीच एक अभिनेत्री आहे. दीप्तीने 'यात्रा' आणि 'मुसाफिर हू यारो'सारख्या प्रोग्राममधून नाव कमावले. यासोबतच, तिने अनेक सिनेमांमध्येही काम केले. सिनेमांमध्ये काम करूनदेखील तिचे करिअर यशाच्या मार्गाने चालले नाही. सध्या फिल्मी इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या दीप्तीचा आज 47वा वाढदिवस आहे.
मेरठपासून मुंबईपर्यंतचा प्रवास
दीप्तीचा जन्म 30 सप्टेंबर 1967मध्ये मेरठ येथे झाला. तिने शालेय शिक्षण दिल्लीमधून घेतले. त्यानंतर मेरठ यूनिव्हर्सिटीमधून तिने पुढील शिक्षण पूर्ण केले मेरठमध्ये तिच्या कुटुंबीयांची एक हँडीक्राफ्ट फॅक्टरी होती. तिने 1992मध्ये फॅक्ट्रीला प्रमोट करण्यासाठी तिने मुंबईला येऊन एका जाहिरात कंपनीचा शोध घेतला. त्यावेळी तिला एका जाहिरात कंपनीने मॉडेलिंगच्या माध्यमातून मिलन साडीचे प्रमोशन करण्याची ऑफर दिली. तिने त्या माध्यमातून 12 कॅम्पेनमध्ये काम केले. तिने स्वत:च्या फॅक्ट्रीसाठी मॉडेलिंग केले आणि बघता-बघता ती एक प्रोफेशनल मॉडेल बनली. तिने 1990मध्ये तिने Eves Weekly स्पर्धासुध्दा जिंकलेली होती. त्यानंतर तिने सिंगापूरला जाऊन इंटरनॅशनल फॅशन वीकमध्ये मॉडेलिंग केली.
अभिनयाची मिळाली संधी
मॉडेलिंगच्या यशानंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे दार तिच्यासाठी खुले झाले. तिने 1995मध्ये 'राम-शस्त्र'मध्ये जॅकी श्रॉफ आणि मनीषा कोईराला यांच्यासह काम केले होते. या सिनेमाने तिच्यासाठी तामिळ, कन्नडी. तेलगू इंडस्ट्रीचेसुध्दा दार उघडले. 1999मध्ये आमिर खानसोबत तिला 'मन' सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. मात्र तिने केलेल्या सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यामुळे तिचा डाऊन फॉल सुरु झाला. सिनेमांच्या अपयशाने तिला दीप्तीला छोट्या पडद्याचा आधार घ्यावा लागला.
तिने 2001मध्ये तिने 'यात्रा'मधून छोट्या पडद्यावर एंट्री केली. या शोमधून तिने देशातील धार्मिक ठिकाणांची लोकांना ओळख करून दिली. हा शो खूप लोकप्रिय ठरला होता. त्यामुळे 'मुसाफिर हू यारो'मध्ये करण्याची संधी तिच्याकडे चालून आली. हादेखील एक ट्रॅव्हल शो होता. या शोसाठी 6 वर्षांमध्ये दीप्तीने 80 देशांचा प्रवास केला होता. त्यानंतर तिने स्वत:च्याच नावाची एक प्रॉडक्शन कंपनी सुरु केली.
प्रेम आणि लग्न
दीप्ती 'मुसाफिर हू यारो'च्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक रणदीप आर्यच्या प्रेमात पडली. दिर्घकाळाच्या अफेअरनंतर त्यांनी लग्न केले. दोघांना आता शिव आणि शुभ असे दोन मुले आहेत. दीप्ती आता इंडस्ट्रीपासून दूर झाली असली तरी, तिने स्वत:ची ऑनलाइन यात्रा चॅनल 'travelwithdeeptibhatnagar.com' सुरु ठेवलेली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दीप्ती भटनागरच्या पर्सनल लाइफचे खास Pics...