आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीप्ती देणार दिग्दर्शनावर लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीप्ती नवलने दिग्दर्शिका म्हणून ‘दो पैसे की धूप चार आने की बारिश’ हा पहिला सिनेमा बनवला होता. मात्र हा सिनेमा आजपर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यानंतर दीप्तीने अभिनयाचे अनेक प्रस्ताव स्वीकारले. ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’, ‘लिसन अमाया’, ‘औरंगजेब’, ‘इनकार’, ‘बी.ए.पास’आणि ‘यारियां’अशा सिनेमांत तिने काम केले होते. तरीदेखील ती पुन्हा आपला मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवणार आहे. लवकरच दीप्ती आपल्या आगामी सिनेमाचे दिग्दर्शनाचे काम सुरू करत आहे.
या सिनेमात ‘बी.ए.पास’ फेम अभिनेत्री शिल्पा शुक्लाची प्रमुख भूमिका राहणार आहे. सिनेमा एका बोल्ड विषयावर आधारित असणार आहे. याशिवाय ती आणखी एका सिनेमाच्या विचारात आहे. सिनेमाचे नाव ‘कलर्स ऑफ स्नो’ असल्याचे सांगण्यात येत आहे.