आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीके: सिनेमात काही आक्षेपार्ह नसल्याचे सांगत हायकोर्टाने फेटाळली याचिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'पीके' सिनेमामध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचे दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि अभिनेता आमिर खान यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली जनहित याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे.

सिनेमात हिंदू देवतांची पूजा, हिंदू श्रद्धा, उपासना विरुद्ध टीका झाल्याचे सांगत या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्यायमूर्ती आर एडलॉ यांच्या खंडपीठाने ती फेटाळून लावली आहे.
सिनेमामध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचे सांगत, या प्रकरणी नंतर सविस्तर आदेश देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. अजय गौतम यांनी ही याचिका दाखल केली होती.
'पीके' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोव-यात आहे. सिनेमात आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत, संजय दत्त, बोमन इराणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमा राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केला आहे.