आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dera Sacha Sauda Godman Baba Ram Rahim Ready To Enter Bollywood

बाबा राम रहीम यांची फिल्‍मी अॅक्‍शन \'हिट\', साडे पाच लाख प्रेक्षकांनी पाहिला ट्रेलर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: सिनेमातील एका दृश्यात बाबा राम रहीम)

नवी दिल्ली- डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांचा पहिला सिनेमा 'MSG -The Messenger of God' चा ट्रेलर Youtube वर हिट झाला आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेला सिनेमाचा ट्रेलर आतापर्यंत जवळपाच साडे पाच लाख प्रेक्षकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये बाबा राम रहीम एका दृश्यात शत्रुला हवेत फेकताना दिसत आहे. तसेच ते आपल्या अनुयायींना एखादा 'रॉकस्टार'प्रमाणे संबोधित करताना दिसत आहे. 'MSG -The Messenger of God' हा सिनेमा 16 जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

47 वर्षीय बाबा राम रहीम यांनी सिनेमात प्रमुख भूमिका साकारली असून सिनेमाचे दिग्दर्शन, स्क्रिप्ट, स्क्रीनप्ले आणि गीतही बाबा राम रहीम यांनीच लिहिले आहेत.

देशात पाच भाषांमध्ये आणि 3 हजार स्क्रीनवर होईल प्रदर्शित होईल...
बाबा राम रहीम यांचा सिनेमा देशभरात 3 हजार स्क्रीन्सवर पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यात हिंदी, तमिळ, तेलगु, मल्याळम आणि इंग्रजीचा समावेश आहे. अमेरिका, इटली, न्यूजीलँड, कॅनेडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह 10 देशांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित करण्याचा बाबा राम रहीम यांचा मानस आहे.
डेरा सच्चा सौदाचे जगभरात पाच कोटी अनुयायी आहेत. यामुळे 'MSG -The Messenger of God' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

13 लाख लोकांनी केले काम
बाबा राम रहीम यांच्यासह त्यांच्या 13 लाख अनुयायींनी सिनेमात काम केले आहे. सिनेमाचे दिग्दर्शनात बाबा राम रहीम यांना जीतू अरोरा यांनी मदत केली आहे. जीतू अरोरा याने 'क्योंकि सास भी कभी बहू थी'सारख्या हिट सीरियलचे दिग्दर्शन केले आहे. या सीरियलमध्ये विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनीही भूमिका साकारली आहे.

नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत बाबा राम रहीम यांनी भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा केली होती. हरियाणातील सिरसा येथे डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. बाबा राम रहीम यांच्याविरोधात बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहे.

बाबा राम रहीम यांनी सहा पेक्षा जास्त म्युझिक अल्बम रिलीज झाले आहेत. 'हायवे लव्ह चार्जर' त्यांचा लेटेस्ट अल्बम आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून बघा, बाबा राम रहीम यांच्या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टर...