आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushant Singh Rajput Starer Upcoming Hindi Film Detective Byomkesh Bakshy Trailer Launched

\'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी\'चा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO+PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी'च्या ट्रेलरमध्ये सुशांत आणि स्वस्तिका)
मुंबईः यशराज स्टुडिओत बुधवारी आगामी 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या सिनेमाची कथा 1932-1970च्या काळात प्रसिद्ध झालेल्या आणि शरदिंदू बंदोपाध्याय यांनी आपल्या कल्पनेतून साकारलेल्या 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी'वर आधारित आहे. या सिनेमात सुशांत सिंह राजपूत मेन लीडमध्ये झळकणार आहे.
बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने सिनेमात एका नृत्यांगणेची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री दिव्या मेनन सुशांतच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकणार आहे. ठ्रेलरमध्ये सुशांत आणि स्वस्तिकाची रोमँटिक केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे.
दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित या सिनेमाचे निर्माते आदित्य चोप्रा आहेत. सुशांत सिंह राजपूत, स्वस्तिका आणि दिव्या यांच्याव्यतिरिक्त आनंद तिवारी आणि म्यांग चांग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. 3 एप्रिल 2015 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी'च्या ट्रेलरची झलक..