आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dia Mirza, Sania Mirza, Divya Datta And More Celebs Attend Children's Film Festival In Capital.

खास मुलांसाठी आयोजित इव्हेंटमध्ये दीया, सानियासह सहभागी झाले सेलेब्स, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सानिया मिर्झा आणि दीया मिर्झा)
मुंबईः अभिनेत्री दीया मिर्झा आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा बालदिनाच्या निमित्ताने NCFF (National Children's Film Festival) च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या इव्हेंटमध्ये या दोघींसह आणखी काही सेलिब्रिटी आले होते. मुंबईतील श्री फोर्ट ऑडिटोरियममध्ये या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दीया ब्लू साडीत दिसली. पारंपरिक रुपात दीया खूप सुंदर दिसली. तर सानिया मिर्झा रेड कलरच्या अनारकलीत दिसली. या दोघांव्यतिरिक्त दिव्या दत्ता, साक्षी तन्वर आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल या इव्हेंटमध्ये दिसले.
NCFF (National Children's Film Festival)च्या वतीने मुलांसाठी फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या इव्हेंटमध्ये स्वच्छता अभियानाला प्रमोट करण्यात आले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या इव्हेंटमध्ये सामील झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...