आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिया मिर्झाने केला साखरपुडा, पाहा भावी नव-यासोबतचे खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती दिया मिर्झाने तिचा बॉयफ्रेंड आणि बिझनेस पार्टनर साहिल संघासोबत साखरपुडा केला. आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर दियाने ट्विट केले, ऑफिशियली एंगेज्ड. या ट्विटसोबतच तिने वरील छायाचित्रसुद्धा पोस्ट केले. हे ट्विट दियाने 29 एप्रिल रोजी केले.
खरं तर साहिल आणि दियाचे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न होणार होते. मात्र ऐनवेळी साहिलच्या कुटुंबातील एका सदस्याची प्रकृती बिघडल्यामुळे लग्न रद्द करण्यात आले. त्यावेळी लग्नाच्या पत्रिकांचेही वाटप झाले होते. त्यामुळे दियाचे हे ट्विट समजणे जरा कठीण आहे. दियाच्या ट्विटनंतर बी टाऊनमधील अनेक सेलेब्सनी तिला शुभेच्छा दिल्या.
दिया आणि साहिल अलीकडेच यूएसमधील फ्लोरिडा शहरातील टेम्पा बेमध्ये आयोजित आयफा सोहळ्यात सहभागी झाले होते. यावर्षी हे दोघे लग्नगाठीत अडकण्याची शक्यता आहे.
कोण आहे दिया मिर्झा?
2000मध्ये दियाने मिस एशिया पॅसिफिकचा खिताब आपल्या नावी केला होता. त्यानंतर 2001मध्ये 'रहना है तेरे दिल में' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमासाठी तिला बेस्ट डेब्यूचा अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर ती 'दम', 'तुमको न भूल पाएंगे', 'लगे रहो मुन्नाभाई', 'तुमसा नहीं देखा' या सिनेमांमध्ये झळकली. आता दिया निर्माती झाली आहे.
कोण आहे साहिल संघा?
साहिल संघा बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ओळखला जातो. दिग्दर्शक म्हणून साहिलने 'लव, ब्रेकअप जिंदगी' हा सिनेमा तयार केला होता. तर 'सलाम-ए-इश्क' या सिनेमासाठी त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. दिया आणि साहिलने बॉर्न फ्री एन्टरटेन्मेंट प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहे. कमिंग ऑफ एज या आगामी सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन साहिल करतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दिया-साहिलची खास छायाचित्रे...