(फाइल फोटो - दीया मिर्झा आणि साहिल संघा)
बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झाने काही महिन्यांपूर्वी बिझनेसमन साहिल संघासह साखरपुडा केला होता. आता हे कपल लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचे कळते. या दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली असून यावर्षी 18 ऑक्टोबरला या दोघांचे लग्न होणार आहे.
स्वतः दीयाने ही गूड न्यूड आपल्या चाहत्यांना दिली आहे. दीयाने सांगितले, "फायनली आमच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. 18 ऑक्टोबरला मी आणि साहिल लग्न करत आहोत."
दिल्लीत हा लग्नसमारंभ पार पडणार आहे. या लग्नात दीया आणि साहिलच्या कुटुंबीयांसह जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.
लग्नानंतर मुंबईत एका ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते.
साहिल मुळचा दिल्लीचा रहिवाशी आहे आणि त्याचे बरेचसे नातेवाईक दिल्लीतच वास्तव्याला आहेत. त्यामुळे लग्नाचे स्थळ दिल्ली निश्चित करण्यात आले आहे. दिल्लीत लग्न करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबाचा असल्याचे दीयाने सांगितले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लवकरच रेशीमगाठीत अडकणा-या दीया आणि साहिलची ही खास छायाचित्रे...