Home | News | Diana Penty Ready To Get Married

'कॉकटेल' गर्ल डायना पेंटी लवकरच अडकणार लग्नगाठीत

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 30, 2014, 01:22 PM IST

'कॉकटेल' मध्ये दिसलेली अभिनेत्री डायना पेंटीने लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.. मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणार्‍या डायना पेंटीचा 'कॉकटेल' नंतर दुसरा चित्रपट आला नाही. '

  • Diana Penty Ready To Get Married

    'कॉकटेल' मध्ये दिसलेली अभिनेत्री डायना पेंटीने लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.. मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणार्‍या डायना पेंटीचा 'कॉकटेल' नंतर दुसरा चित्रपट आला नाही. 'कॉकटेल'मध्ये मीराची भूमिका साकारत तिने खूप प्रशंसा मिळवली होती. त्यानंतर मात्र तिला कोणतीच दमदार भूमिका मिळाली नाही. त्यामुळे तिने दुसरे चित्रपट साइन केले नाहीत. या दरम्यान ती हिरे व्यापारी हर्ष सागरसोबत डेटिंग करत असल्याची चर्चा होती. सूत्रानुसार, डायनाचा चित्रपट करिअरऐवजी लग्न करून संसारात रमण्याचा विचार आहे. लवकरच ती आपला प्रियकर हर्षसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
    हर्ष आणि डायना एकमेकांवर खूप प्रेम करतात. या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची त्यांची इच्छा आहे. आता डायनाने लग्नाचा निर्णय घेतला आहे, पण तारीख अद्याप निश्चित केली नाही.

  • Diana Penty Ready To Get Married
    हर्ष आणि डायना 

Trending