Home »TV Guide» Did Aamir Hide The ‘Satya On Satyameva Jayate'

सत्यमेव जयते मध्ये आमिरने का लपवले 'सत्य'

टीना कृष्णन | May 15, 2012, 14:48 PM IST

  • सत्यमेव जयते मध्ये आमिरने का लपवले 'सत्य'

आमिर खानचा टेलिव्हिजन शो 'सत्यमेव जयते' मध्ये बालवयात लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या हरिष अय्यरच्या आयुष्यातील पूर्ण सत्य का सांगितले गेले नाही ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
हरिष गे चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ता आहे. सार्वजनिक व्यासपीठावर तो त्यासंबंधी आवाज देखील बुलंद करतो. २९ एप्रिलला एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत तो त्याच्या आईसह सहभागी झाला होता आणि त्याने समलैंगिकतेचे पूर्णपणे समर्थनही केले होते.
हरिषच्या आयुष्यावर बेतलेले 'आमेन' आणि 'आय एम अभिमन्यु' हे दोन चित्रपटही तयार झाले आहेत. सध्या तो बाल लैंगिक शोषणाच्या विषयावर एक पुस्तक लिहित आहे. गे समुदायाच्या मुंबईत होणा-या प्रत्येक कार्यक्रमात त्याचा सक्रिय सहभाग असतो. तसेच तो त्याच्या समलैंगिकतेबद्दल फेसबुक आणि ट्विटरवर चर्चा देखील करीत असतो.
अय्यर सात वर्षांचा असताना त्याच्या नातेवाईकाने त्याच्यावर अत्याचार केले होते. या त्रासाला तो अनेक वर्ष सामोर गेला. १९ व्या वर्षी त्याला तो समलिंगी असल्याची जाणीव झाली. तो 'असा' होण्यामागे त्याचे बालवयात झालेले लैंगिक शोषणच त्याला कारणीभूत असल्याचे तो स्पष्ट करतो.
असं सर्व असतांना 'सत्यमेव जयते' मध्ये हरिषने त्याच्या आयुष्यातील 'हा' पैलू का झाकून ठेवला? याबद्दल तो काहीच का बोलला नाही? तो स्वतः हे लपवून ठेवू इच्छित होता की, आमिरने जाणीवपूर्वक या गोष्टी उजेडात येऊ दिल्या नाही. आमिर खान काही सेफ गेम तर खेळत नाही ? की, त्याची अशी धारणा आहे की, लोकांना पूर्ण सत्य पचले नसते ?
आता उत्सूकता आहे की, आमिर खान त्याच्या कार्यक्रमावर उपस्थित झालेल्या या प्रश्नांवर काय उत्तर देतो ते ? सत्यमेव जयते !
लांच्छनास्पद : हरिषवर ११ वर्षे सूरू होता बलात्कार
राजस्थानमध्ये वीस वर्षीय तरुणीवर सलग दोन महिने बलात्कारNext Article

Recommended