आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Did Girlfriend Problem Lead To Salman Khan’S Accident?

सलमानच्या हातून घडलेल्या अपघाताला ऐश्वर्या तर कारणीभूत नाही ना?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2002 हे वर्ष अभिनेता सलमान खानसाठी खूप वाईट ठरले. गुन्‍हेगारी जगताशी संबंध असल्‍याचा खुलासा, ऐश्‍वर्या रायबरोबर झालेली मारहाण, यामुळे त्‍याच्‍या व्‍यावसायिक जीवनाला चंद्रग्रहण लागले होते. त्यातच सलमान खान हिट अँड रन प्रकरणात अडकला. त्‍या रात्री सलमानने दारू पिऊन 100 पेक्षा जादा वेगाने गाडी चालवली आणि त्यात त्‍याने फुटपाथवर झोपलेल्या माणसांना चिरडले होते. या प्रकरणामुळे ऐश्‍वर्याचे कुटूंब सलमान खानच्‍या विरोधात उभे राहिले होते.
म्हटले जाते, की त्याकाळात सलमानचे सिनेमे एकामागून एक फ्लॉप ठरत होते. याशिवाय त्याचकाळात ऐश्वर्याने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते, की तिचे आणि सलमानचे ब्रेकअप झाले आहे. मात्र तो (सलमान)मानायलाच तयार नाही. ब्रेकअपनंतरसुद्धा त्याने तिला त्रास देणे सुरु ठेवले होते.
ऐश्वर्याच्या या मुलाखतीनंतर सलमान सतत तणावात असल्याचे ऐकिवात आहे. त्‍यारात्री सलमान दारूच्‍या नशेत गाडी चालवत होता. त्‍याच्‍या बॉडीगार्डने त्‍याला गाडी कमी वेगाने चालवण्‍याचे सांगितले. पण जे घडायचे तेच घडले. सलमानने आपल्‍या लँड क्रूजरने वांद्रा येथे फुथपाथवर झोपलेल्‍या ना‍गरिकांना चिरडले. यात एकाचा मृत्‍यू झाला होता. या घटनेनंतर अनेक प्रश्‍न उपस्थित करण्‍यात आले. चित्रपटसृष्‍टीतील मोठा अभिनेता असताना त्‍याच्‍याकडून एवढा मोठा गुन्‍हा का घडला? त्‍याने आपल्या बॉडीगाडचेही काही ऐकले नाही.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशा काही गोष्टी ज्यामुळे सलमानच्या हातून हा अपघात घडला...