आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : अनिल कपूरच्या पार्टीत भावासोबत पोहोचली प्रियांका, विदाऊट मेकअपमध्ये दिसली श्रीदेवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः भाऊ सिद्धार्थसोबत प्रियांका चोप्रा, अभिनेत्री श्रीदेवी)
मुंबईः सोमवारी रात्री बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने मुंबईतील आपल्या राहत्या घरी एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा धाकटा भाऊ सिद्धार्थ आणि आई मधू चोप्रासोबत सहभागी झाली होती. यावेळी प्रियांका व्हाइट अँड ब्लू आउटफिटमध्ये तर सिद्धार्थ व्हाइट टी-शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसला. अभिनेता अर्जुन कपूरसुद्धा त्याची धाकटी बहीण अंशुलासोबत या पार्टीत पोहोचला होता.
अनिल कपूर यांनी 'दिल धडकने दो' या आपल्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर स्क्रिनिंगच्या निमित्ताने ही पार्टी ठेवली होती. झोया अख्तर दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर 15 एप्रिल रोजी रिलीज करण्यात आला आहे. सिनेमात प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह, अनिल कपूर, अनुष्का शर्मा आणि शेफाली शाह मेन लीडमध्ये आहेत.
या पार्टीत बी टाऊनमधील बरीच मंडळी सहभागी झाली होती. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची धाकटी बहीण शमिता शेट्टी, अर्जुन कपूर, राहुल बोस, दिग्दर्शिका झोया अख्तर, श्रीदेवी, निर्माते बोनी कपूर आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी, अनुपम खेर, शेफाली शाह, निर्माते विपुल शाह यांच्यासह बरेच सेलिब्रिटी येथे पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...