मुंबई: ट्रॅजेडी किंग नावाने प्रसिध्द दिलीप कुमार यांची आत्मकथा 'सब्सटेन्स अँड शॅडो'चे सोमवारी
अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि आमिर खान यांनी प्रकाशन केले. यावेळी दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानोसुध्दा उपस्थित होत्या.
काय आहे आत्मकथेत
- या बायोग्राफीमध्ये दिलीप कुमार यांनी राजकपूर, मधुबाला, देवानंद यांच्याविषयी कधीही न सांगितलेले प्रसंग लिहिले आहेत. मधुबालापासून विभक्त होण्यामागे मधुबालाचे वडील जबाबदार असल्याचे दिलीप साहेबांनी या आत्मकथेत सांगितले आहे.
- लेखिका उदय तारा नायर यांनी चार वर्षांच्या कालावधीत दिलीप साहेबांच्या अनेक मुलाखती घेऊन हे पुस्तक लिहिले.
सोहळ्याला कोण-कोणत्या सेलेब्सनी लावली हजेरी?
आमिर खान, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, माधुरी दीक्षित, दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो,
प्रियांका चोप्रा, किरण राव, विनोदवीर कपिल शर्मा, विनोदवीर अली असगर, रितेश देशमुख, करण जोहर, अयुब खान, अनिल अंबानी, कोकिलाबेन अंबानी, संजयलीला भन्साळी, डॉ. श्रीराम नेने, गायक शान, जावेद अख्तर या सेलेब्ससह अनेकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सोहळ्याची खास क्षणचित्रे आणि सेलेब्सची छायाचित्रे...