आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, सायरा यांनी अशा दिल्या शुभेच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिलीप कुमार आणि सायरा बानो)
मुंबई- अभिनेता दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. खोकला-सर्दी आणि फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची पत्नी सायरा बानोसुध्दा त्यांच्या सोबत दिसल्या.
दिलीप कुमार यांचा आज वाढदिवस आहे आणि आजच त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळली. त्याना पाहण्यासाठी हॉस्पिटल बाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. सायरा यांनी दिलीप यांना किस करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिलीप यांची तब्येतील सुधार आल्याचे दिसून आले. या दिग्गज अभिनेत्याला मागील वर्षी सप्टेंबरमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. अलीकडेच, दिलीप कुमार यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यानंतर त्यांची पत्नी सायरा बानो यांनी एक फोटो शेअर करून सांगितले होते, की दिलीप साहेब ठिक आहेत.
दिलीप कुमार यांनी 'ज्वार भट' (1944) या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. मात्र या सिनेमातून त्यांना खास ओळख मिळाली नाही. त्यानंतर 1947मध्ये त्यांनी 'जुगनू'मध्ये काम केले. हा सिनेमा यशस्वी ठरला आणि लोकांनी त्यांना पसंत केले. या सिनेमानंतर दिलीप साहेबांनी 'शहीद', 'अंदाज', 'दाग', 'दीदार', 'मधुमती', 'देवदास', 'मुसाफिर', 'नया दौर', 'आन', 'आजाद'सारखे अनेक हिट सिनेमे दिले. प्रत्येक यशस्वी सिनेमानंतर त्यांचे नाव शिखरावर पोहोचत गेले.
सायरा बानो देणार पार्टी-
सायरा बानो यांनी सांगितले, की दिलीप साहेब ठिक झाले आहेत. परंतु डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांची बर्थडे पार्टी जवळच्या मित्रांसोबत साजरी केली जाणार आहे. सायरा यांनी आपे मित्र आणि नातेवाईकांसाठी एक पार्टीचे आयोजन केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दिलीप कुमार यांची छायाचित्रे...