आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार एकेकाळी होते फळविक्रेते, जाणून घ्या त्यांच्याविषयी बरेच काही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटसृष्टीची जिवंत दंतकथा म्हणून ख्याती असलेले दिलीपकुमार यांची बायोग्राफी सोमवारी लाँच करण्यात आली. उदय तारा नायर यांनी लिहिलेल्या या बायोग्राफीमध्ये दिलीप साहेबांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या बायोग्राफी लाँचवेळी बॉलिवूडमधील अनेक बडी मंडळी हजर होती. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, आमिर खान, माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा, जावेद अख्तर, किरण राव, संजय लीला भन्साळी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
आपल्या दमदार अभिनायने गेल्या अनेक दशकांपासून चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या 91 वर्षीय दिलीप कुमार यांच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल रसिकांना फारशी माहिती नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्या जीवनाचा आढावा घेणारे 'सबस्टन्स अँड शॅडो' हे पुस्तक म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच आहे. या पुस्तकात दिलीप कुमार यांचा जन्म, त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश, तेथील इतक्या वर्षांचा प्रवास ते आत्तापर्यंतच्या जीवनाची माहिती आहे.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ट्रॅजेडी किंगच्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगत आहोत.