आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमातील अपयशापासून ते दुस-या लग्नापर्यंत, जाणून घ्या दिलीप साहेबांच्या लव्ह लाईफविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

91 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते आणि ट्रेजेडी किंग या नावाने असलेले दिलीप कुमार यांची आत्मकथा 'सब्सटेन्स अँड शॅडो'चे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि आमिर खान यांनी सोमवारी प्रकाशन केले. यावेळी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो उपस्थित होत्या.
लेखिका उदय तारा नायर यांनी दिलीप साहेबांनी कथन केलेले प्रसंग या आत्मकथेत उतरवले आहेत. या बायोग्राफीमध्ये दिलीप कुमार यांनी आपल्या आयुष्यातील अनेक घटनांवर प्रकाशझोत टाकला आहे. मधुबालापासून विभक्त होण्यामागे मधुबालाचे वडील जबाबदार असल्याचे दिलीप साहेबांनी या आत्मकथेत सांगितले आहे.
दिलीप साहेबांनी नेहमीच स्वतःला वादविवादांपासून दूर ठेवले होते. मात्र त्यांच्या लव्ह लाईफविषयीची चर्चा नेहमीच होत राहिली. 11 ऑक्टोबर 1966 रोजी दिलीप साहेबांनी त्यांच्यापेक्षा वयाने 22 वर्षे लहान असलेल्या सायरा बानोबरोबर लग्न करुन सगळ्यांनाच अचंबित केले होते. सायरा बानोपूर्वी दिलीप साहेबांच्या आयुष्यात दोन स्त्रिया होत्या.
पुढील स्लाईड्समधून एक नजर टाकुया दिलीप साहेबांच्या लव लाईफ आणि त्यांच्याशी निगडीत वादांवर...